मी ॲडव्होकेट. शैलेश बालाजी आयनिले .वय-३१ वर्ष , व्यवसाय-वकिली, रा कपिल नगर खाडगाव रोड लातूर,संपर्क ९९७०१६६२५५
आज पासून दररोज ब्लोग लिहिण्यासाठी सुरवात करीत आहे. मां जगदंबा व
मासाहेब जीजाऊ यांचा पुढे नत मस्तक होऊन माझ्या ब्लोग ला सुरवात करीत आहे.
मी ॲडव्होकेट. शैलेश बालाजी आयनिले .वय-३१ वर्ष , व्यवसाय-वकिली, रा कपिल नगर खाडगाव रोड लातूर,संपर्क ९९७०१६६२५५
आज वार
शुक्रवार तारीख २८/१०/२०२२ ,आज दिवाळी सन संपल्या नंतर चा पहिला दिवस ,आज सकाळी
थोड उशिरा उठलो त्याचे कारण हि काही खासच म्हणावे लागेल ते असे कि ,काल रात्री मी
कानडी चित्रपट ”कांतारा” पाहण्यासाठी मी व माझी पत्नी अॅड. सुचिता
आणि माझे मामा डॉ.सचिन व त्यांच्या पत्नी डॉ.सुनिता यांच्या समवेत रात्री
उशिराच्या चित्रपट प्रक्षेपण पाहण्यासाठी ११ च्या सुमारास गेलो होतो .,
चित्रपट मुळात होता कानडी परंतु तो हिंदी डब्बाड असल्यामुळे फारसा काही फरक पडला नाही ,चित्रपट
ग्रहात जाण्यापूर्वी माझ्या कडून एक मोठी चूक घडली होती ती अशी कि ,मी चित्रपटाची
तिकिटे हि online व उशिरा बुक केल्यामुळे आम्हाला खालच्या रोव (लाईन ची अनुक्रमे D1,D2,D3 )
भेटली त्यात चित्रपट हाऊस फुल आणि दिवाळीच्या सुट्ट्या या सर्व गोष्टीचा संगमच
जुळून आला होता . यात हे जे सर्व सांगतोय याच्या साठी कि माझ्या सोबत जे मामा व
मामी आले होते ते अतिशय प्रसिद्ध डॉक्टर
आहेत आणि मी बुक केलेले तिकिटे हि चुकीची असून,
ज्या रो ची तिकटे घेतली होती तेथे महिला स्त्रिचा
किंवा त्यांच्या prestige ला ते शोभणारे नव्हे असे ते म्हणाले त्यानंतर, मी त्यांचा हिर- मुसलेला चेहरा पाहून किंवा चिड खोर नजर पाहून मी तिकिट counter कडे जाऊन विचारपूस केली असता “ त्यांनी शो हाउस फुल आहे आणि आपणास दुसरी कुठली
हि वरचे टिकेटे मिळणार नाहीत” असे उत्तर
मिळाले, त्यानंतर मी परत मामा समोर आलो आणि त्यांना घडलेली हकीकत सांगितली आणि नंतर
मी आमच्या सोबत महिला / स्त्री असल्यामुळे मी तेथे बसलेल्या प्रेक्षकाला “ माझ्या सोबत माझी फॅमिली
आलेली आहे तुम्ही जरा जागा देता म्हन्त्लाय नंतर त्यांनी जागा दिली “ परंतु त्या केवळ ३ सीट्स होत्या परंतु माझे
टीकेत हे पुढच्या रोव चे होते , त्यामुळे मला तेथे जाऊन बसावे लागले.
रात्री उशिरा
चित्रपट संपला त्यामुळे मी व माझी पत्नी घरी न जाता मामाच्या घरी राहिलो .
nice information
ReplyDelete