मी ॲडव्होकेट. शैलेश बालाजी आयनिले .वय-३१ वर्ष , व्यवसाय-वकिली, रा कपिल नगर खाडगाव रोड लातूर,संपर्क ९९७०१६६२५५
आज पासून दररोज ब्लोग लिहिण्यासाठी सुरवात करीत आहे. मां जगदंबा व मासाहेब जीजाऊ यांचा पुढे नत मस्तक होऊन माझ्या ब्लोग ला सुरवात करीत आहे. मी ॲडव्होकेट . शैलेश बालाजी आयनिले .वय-३१ वर्ष , व्यवसाय-वकिली, रा कपिल नगर खाडगाव रोड लातूर,संपर्क ९९७०१६६२५५ आज वार शुक्रवार तारीख २८/१०/२०२२ ,आज दिवाळी सन संपल्या नंतर चा पहिला दिवस ,आज सकाळी थोड उशिरा उठलो त्याचे कारण हि काही खासच म्हणावे लागेल ते असे कि ,काल रात्री मी कानडी चित्रपट ” कांतारा ” पाहण्यासाठी मी व माझी पत्नी अॅड. सुचिता आणि माझे मामा डॉ.सचिन व त्यांच्या पत्नी डॉ.सुनिता यांच्या समवेत रात्री उशिराच्या चित्रपट प्रक्षेपण पाहण्यासाठी ११ च्या सुमारास गेलो होतो ., चित्रपट मुळात होता कानडी परंतु तो हिंदी डब्बाड असल्यामुळे फारसा काही फरक पडला नाही ,चित्रपट ग्रहात जाण्यापूर्वी माझ्या कडून एक मोठी चूक घडली होती ती अशी कि ,मी चित्रपटाची तिकिटे हि online व उशिरा बुक केल्यामुळे आम्हाला खालच्या रोव (लाईन ची अनुक्रमे D1,D2,D3 ) भेटली त्यात चित्रपट हाऊस फुल आणि दिवाळीच्या...